Monday Motivation Poems ( Best मराठी कविता )

Monday Motivation Poems
Monday Motivation Poems

मराठी साहित्यात अनेक लेखक होऊन गेले. त्यापैकी नाव म्हणजे व. पु. काळे. वसंत पुरूषोत्तम काळे यांचे मराठी कविता आयुष्याला प्रेरणा देणारे कविता आम्ही तुम्हाला इथे देत आहोत. तुम्ही सोळाचे असा नाही तर ,साठीचे असा तुम्हाला तुमच्या त्या काळात घेऊ जाणारी, ही एक भन्नाट कविता एकदा वाचाच.

1 Monday Motivation Poems ( Best मराठी कविता )

माझं घर तसं तीन खोल्यांचेच होतं
आजोबांपासून नातवापर्यंत भरलेल होत,
पोपट, कुत्रा, मांजरांनाही मुक्तद्वार होतं
घरादाराला कधीही ’लॉक’ नव्हतं..
तरीही माझ जीवन सुखाचं होतं || 1 ||

आजोबांच स्थान घरात सर्वोच्च होतं
स्वयंपाकघर आजीच्या ताब्यात होत,
पाहुण्यांचे येणे-जाणे नित्याचेच होतं
आई-बाबांना एकमेकांशी बोलताही येत नव्हतं..
तरीही माझं जीवन सुखाचं होतं || 2 ||

घरासमोर छोटंसं अंगण होतं
तुळस, प्राजक्ताला तिथे फुलता येत होतं,
दारात रांगोळी काढणे अनिर्वाय होतं
विहिरीवरून पाणी भरण कष्टाचं होतं,
तरीही माझं जीवन सुखाचं होतं || 3 ||

आंघोळीला लाईफ़बॉय साबण असायचा,
माणसापासून म्हशीपर्यंत सगळ्यांनाच चालायचा,
दात घासायला कडुलिंबाचा फ़ाटा लागायचा-
दगडाने अंग घासणं फ़ारसं सुसह्य नव्हतं
तरीही माझं जीवन सुखाचं होतं || 4 ||

पायात चप्पल असणं सक्तीच नव्हतं
अंडरपॅट बनियनवर फ़िरणं जगन्मान्य होतं
शाळेसाठी मैलभर चालण्याचं अप्रूप नव्हतं
मोठ्यांना सायकलशिवाय दुसरं वाहन नव्हतं..
तरीही माझं जीवन सुखाचं होतं || 5 ||

शाळेत गुरुजनांप्रती आदर होता
घोकंपट्टीला दुसरा पर्यायच नव्हता,
पाढे पाठांतराचा आग्रह सर्वत्र होता
छडी हे शिक्षकाचं लाडकं शस्त्र होतं..
तरीही माझं जीवन सुखाचं होतं || 6 ||

शाळेत गरीब श्रीमंत हा भेदभाव नव्हता,
नादारी सांगण्यात काही संकोच नव्हता,
अंगणात येवून शिकणाराही एक वर्ग होता
कलांना “भिकेचे डोहाळे” असंच नाव होतं,
तरीही माझं जीवन सुखाचं होतं || 7 ||

नव्या कपड्यांचा लाभ लग्न-मुंजीतच व्हायचा
पाटाखालच्या इस्त्रीला पर्याय नसायचा,
शाळेचा युनिफोर्म थोरल्याकडूनच मिळायचा
तिन्हीसांजेला घरी परतणं सक्तीच होतं,
तरीही माझं जीवन सुखाचं होतं || 8 ||

वळचणीत चिमण्यांच्या पिढ्या नांदायाच्या
पोपटांचा थवा झाडावर विसावायचा,
कुत्रा, मांजर, डुकरानी गाव भरलेला असायचा-
उंदीर, डास, ढेकुण यांचे सार्वभौम्य राज्य होतं..
तरीही माझं जीवन सुखाचं होतं || 9 ||

पुस्तकातले प्राणी अचानक रानात दिसायचे
घाबरगुंडी उडाली तरी ते आपलेच वाटायचे,
उरलेले प्राणी नंतर पेशवेपार्कात भेटायचे,
नॉनवेज खाणं हे तर माहितीच नव्हतं,
तरीही माझं जीवन सुखाचं होतं || 10 ||

शाळेत अभ्यासाला खूप महत्व होतं
नंबरावर बक्षीस/छड्या यांचं प्रमाण ठरत असतं,
कॉपी, गाईड, क्लासेसना स्थानही नव्हतं
वशिल्याने पास होणं माहितीच नव्हतं,
तरीही माझं जीवन सुखाचं होतं || 11 ||

गावची जत्रा हीच एक करमणूक असायची –
चक्र-पाळण्यात फिरण्यात मजा मिळायची,
बुढ्ढीके बाल, गाठीशेवेची तोंडलावणी व्हायची
विमानातला फोटो काढणं चमत्कारिक होतं,
तरीही माझं जीवन सुखाचं होतं || 12 ||

गावाबाहेरच जग हिरवागार असायचं
सगळ्या नद्यांचे पाणी स्वच्छच असायचं,
पावसाळ्यात ढगांनी आकाश भरायचं,
प्रदूषण, पर्यावरण वगैरे माहितीच नव्हतं,
तरीही माझं जीवन सुखाचं होतं || 13 ||

Va. Pu. Kale Quotes On Life In Marathi

हुतुतू आट्यापाट्याचा खेळ गल्लीत चालायचा
क्रिकेटच्या मॅचेस चाळीत व्हायच्या,
बापू नाडकर्णी, चंदू बोर्डेच्या गोष्टी रंगायच्या
डे-नाईट, ट्वेंटी- २० चं नावही नव्हतं,
तरीही माझं जीवन सुखाचं होतं || 14 ||

प्रवास झालाच तर एस्टीनेच व्हायचा
गचके, ठेचकाळणे याला अंत नसायचा,
हॅन्डल सोबत फिरकीचा तांब्याही लागायचा
लक्झरी, फर्स्टक्लास एसीचं नावही नव्हतं,
तरीही माझं जीवन सुखाचं होतं || 15 ||

दिवाळी खऱ्या अर्थाने दिवाळी होती
चमनचिडी, पानपट्टी, भुईनळ्या यांची रात्र होती,
रंगीत तेल, उटणे, मोती साबणाची ऐश होती
लाडू, चकल्या, करंज्या यांचे दर्शन वार्षिकच होतं..
तरीही माझं जीवन सुखाचं होतं || 16 ||

जुनाट रेडिओतून आकाशवाणी बरसायाची
बिनाका गीतामालेने बुधवारची रात्र सजायची,
रेडीओ सिलोनने तारुण्याची लज्जत वाढायची
ताई, नाना हरबा यांच्या इतकाच बालोद्यान असायचा,
तरीही माझं जीवन सुखाचं होतं || 17 ||

खाण्याच्या बाबतीत भेदभाव केला जायचा
दादाच्या ताटात जास्त शिरा पडायचा,
पानात टाकणाऱ्याच्या पाठीत रट्टा बसायचा
हॉटेलात जाणं तर पूर्ण निषिद्ध होतं,
तरीही माझं जीवन सुखाचं होतं || 18 ||

मामाच्या गावाला कधी जाणं-येण होतं
धिंगामस्ती करायला नैशनल परमिट होतं,
विहिरीत पोहायला तिथेच मिळत होतं
भाऊबिजेला आईच्या ताटात फारस पडत नव्हतं,
तरीही माझं जीवन सुखाचं होतं || 19 ||

घरातले पुरुष कर्तेसवरते असायचे
बायांना दुपारी झोपणे माहिती नसायचे,
पोराबाळाना गोडधोड सणावारीच मिळायचं
प्रायव्हसीला तिथे काडीचंही स्थान नव्हतं,
तरीही माझं जीवन सुखाचं होतं || 20 ||

पाव्हणे रावळे इ.चा घरात राबता असायचा
सख्खा, चुलत, मावस असा भेदभाव नसायचा,
गाववाल्यानाही पंक्तीत सन्मान असायचा
पंक्तीत श्लोक म्हणणं मात्र सक्तीचं होतं,
तरीही माझं जीवन सुखाचं होतं || 21 ||

आज घराऐवजी लक्झुरीयस फ्लॅट आहे
मोपेड, स्कूटर, मोटारचा सूळसुळाट आहे,
टीव्हीवर शंभर वाहिन्यांचा दणदणाट आहे
फास्टफूड, पार्ट्या, ड्रिंक्स याना सन्मान आहे,
कौटुंबिकसुसंवादाची मात्र वानवा आहे || 22 ||

आज मुलांसाठी महागडी शाळा-कॉलेजेस आहेत
दूध, बूस्ट, काॅम्प्लानचा भरपूर मारा आहे,
क्लास, गाईड, कॅल्क्यूलेटरची ऐशच ऐश आहे
कपडे, युनिफोर्म क्रीडासाहित्य हवे तितके आहे,
बालकांच्या नशिबी मात्र पाळणाघर आहे || 23 ||

आज पतीला ऑफिसात मरेस्तोवर काम आहे
सुशिक्षित पत्नीला करियरचा हव्यास आहे,
एक्स्ट्रा ऐक्टीविटीजना घरात सन्मान आहे
छंद, संस्कार यांच्यासाठी क्लासेस उपलब्ध आहे,
आजीआजोबाना वृद्ध आश्रमाचा रस्ता मोकळा आहे || 24 ||

आज घरात प्रचंड आर्थिक सुबत्ता आहे
मागेल ती वस्तू क्षणात हजार होते आहे,
इन्स्टालमेंट, क्रेडीट कार्डचा सूळसुळाट आहे
सध्या बाय वन गेट वनचा जमाना आहे..
पैशांवर समाधान फ्री मिळण्याची मी वाट पहात आहे.. || 25

Monday Motivation Poems
Monday Motivation Poems

___________________________________________________________********_______________________________________________________

मराठी साहित्यात अनेक लेखक आहे.

HP All-in-One 24-df0215in 23.8-Inch FHD with Alexa Built-in

Tags: , ,