Pandharichi Vari (2021) Best विठुरायाच्या दर्शनाचा ध्यास

Pandharichi Vari (2021)
Pandharichi Vari (2021)
बोलेंचि बोल ऐकिजे ।
स्वादेंचि स्वाद चाखिजे ।
कां उजिवडे देखिजे ।
उजिडा जेंवी ॥
….संत ज्ञानेश्वर ( चांगदेव पासष्टी )

Pandharichi Vari (2021) विठुरायाच्या दर्शनाचा ध्यास

मजल दरमजल करत मनाचिये पंढरीची वारी रोजचा प्रवास करुन आनंदाने पूढे पूढे चाललीय. या परंपरागत वारीचे ते विलोभनीय दृश्य आठवून घरोघरी असलेले भक्त जगातील समस्त चिंतापासून दूर होताहेत. त्यांना दिसतेय ते दूरवर भगव्या पताकांनी व्यापलेले आकाश आणि ऐकू येतोय तो फक्त हरिनामाचा गजर. भक्त घरीच वारीप्रमाणेच तिन्ही वेळा हरिपाठाचे पठन करत आहेत.


सर्वच संतांच्या पालखी सोहळ्यातील वारकरी पंढरीतील विठ्ठलाला सगुण रुपात बघून आनंदून जातात त्या मूर्तीलाही मोठा इतिहास आहे.


कर्नाटकातील विजयनगरच्या सम्राटाने ही सुंदर मुर्ती हरण करुन नेली होती. ही मुर्ती पंढरपूरला परत आली ती भक्त भानुदास यांच्या भक्तीमुळे. हे भानुदास म्हणजे संत एकनाथ यांचे आजोबा. आजही या मूर्तीच्या तेजाने चित्त हरपते.


असे जर केवळ मूर्तीकडे बघून चित्त हरपत असेल, तर विठुरायाच्या दर्शनाचा ध्यास घेतलेल्या भक्ताला खरच प्रत्यक्ष विठ्ठलदर्शन झाले तर अत्यानंदाने त्याचे स्वतःचेच भान हरपेल. माऊलींचेही तसेच झाले. गर्भातल्या बालकाशी मातेचा संवाद होतो तो शब्दावीण. माऊलींची अवस्था अशीच झाली. रत्नांच्या दिव्य प्रकाशात न्हावून निघालेल्या काळ्या पाषाणाच्या विठूरायांच्या तेजपुंज मुर्तीच्या पाया पडावे वाटले.. तर डोळे दिपल्याने विठ्ठलाची पाउलेच त्यांना दिसली नाहीत.


क्षेमकुशल विचारण्यासाठी जीव उतावीळ झाला. अलिंगन द्यावे.. विचारपुस करावी वाटले तर विठ्ठलच दिसेना म्हणून वाईट वाटले. डोळ्यांतून अश्रुधारा सुरु झाल्या. हा ‘कर नाटकी’ म्हणजे नाटक करणारा कृष्ण आहे, ठक फसवतात तसा हाती सापडतच नाही कारण.. माऊलींच्या भक्तीने कळस गाठल्याने आत्मा परमात्मा हे अंतरच नष्ट झाले आहे.


माऊलींनी चांगदेवांना जसे सांगितले होते तसेच झाले. शब्दाने स्वतःचा शब्द ऐकावा, गोडीने स्वतःची गोडी चाखावी, उजेडाने आपल्या स्वतःचा उजेड बघावा, याचेच प्रत्यंतर इथेही येत आहे.


माऊलींना सगुण विठ्ठल मूर्ती दिसत नाही कारण तो त्यांच्यातच स्थिरावला आहे. ह्या विठ्ठल हृदयी माऊलींना प्रत्येक जीवामधे असे परमेश्वर दर्शन घडत होते म्हणूनच पूढे “दूरितांचे तिमिर जावो” म्हणत माउलींनी विश्वकल्याणार्थ पसायदान लिहले. माऊलींच्या या अव्दितीय शब्दांनी खरोखरच विठ्ठलाचे लोभस दीव्य रुप समोर उभे ठाकतेय

Pandharichi Vari (2021) विठुरायाच्या दर्शनाचा ध्यास

पांडुरंगकांती दिव्य तेज झळकती ।
रत्नकीळ फाकती प्रभा ।
अगणित लावण्य तेज: पुंजाळले ।
न वर्णावे तेथीची शोभा ॥1॥

कानडा हो विठ्ठलु कर्नाटकु ।
तेणे मज लावियला वेधु ।
खोळ बुंथी होऊनी खुणाची पालवी ।
आळविल्या नेदी सादु ॥2॥

शब्देविण संवादु दुजेवीण अनुवादु ।
हे तव कैसेनि गमे ।
परेहि परते बोलणे खुंटले ।
वैखरी कैसेनि सांगे ॥3॥

पाया पडू गेले तव पाऊलची न दिसे ।
उभाची स्वयंभु असे ।
समोर की पाठिमोरा न कळे ।
ठकचि पडिले कैसे ॥4॥

क्षेमालागी जीव उतावीळ माझा ।
म्हणवूनी स्फुरताती बाहो ।
क्षेम देऊ गेले तव मीचि मी एकली ।
आसवाला जीव राहो ॥5॥

बाप रखुमदेविवरू ह्रीदयीचा जाणुनी ।
अनुभवु सौरसु केला ।
दृष्टीचा डोळा पाहो गेले तव ।
भीतरी पालटू झाला ॥6॥

रचना : संत ज्ञानेश्वर महाराज

Pandharichi Vari (2021)
Pandharichi Vari (2021)
Pandharichi Vari (2021)
Pandharichi Vari (2021)
Pandharichi Vari (1988)
 !! नियम पाळा, सुरक्षित रहा !!
#मनाचिये वारी पंढरीची#

Short Stories For Kids best Indian soldier

Shershaah | शेरशाह Best फिल्म 

Tags: ,